टेंभुर्णी : ‘पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी आपल्याला थेट तळागाळापर्यंत जावे लागेल. गावागावांतील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत वैयक्तिक संपर्क साधून महायुतीचा विचार पोहोचवा आणि बूथनिहाय जबाबदाऱ्या अत्यंत नेटकेपणाने पार पाडा,’ असे आवाहन डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी केले. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आयोजित भाजप-महायुतीच्या प्रचार बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीत माढा परिसरातील पदवीधर मतदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथ सक्षम करणे आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचणे यावर विशेष भर देण्यात आला. याप्रसंगी माढा विधानसभा प्रभारी तथा धुळे ग्रामीणचे आमदार श्री. राघवेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत एकजुटीने काम करण्याचा कानमंत्र दिला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार राघवेंद्र पाटील यांच्यासह सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह (भैय्या) शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील भीमानगरकर, माढा पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा खरात, सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य अण्णा ठाणे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती पंडित देशमुख, माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे आणि योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीला माढा परिसरातील पदवीधर, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल डॉ. स्मिता जाधव यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.