Dr Shirish Valsangkar Case 
सोलापूर

Dr. Shirish Walsangkar Death Case | मनीषावर 22 जून पर्यंत दोषनिश्चिती करु नका : कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश

खटल्यात दोषमुक्त करावे असा अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात मनीषाने दिला होता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रसिध्द न्युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्मत्येप्रकरणी संशयीत आरोपी मनीषा मुसळे-मानेवर 22 जून पर्यंत दोषनिश्चिती करु नये असा आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने दिला.

या खटल्यात दोषमुक्त करावे असा अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात मनीषाने दिला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. या आदेशाविरोधात मनीषाने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचकडे धाव घेत ॲड. प्रसाद पी. कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत रिव्हिजन अर्ज दाखल केला. या अर्जाची सुनावणी न्यायाधिश प्रवीण पाटील यांच्या कोर्टात झाली. त्यानंतर न्यायालयाने मनीषावर 22 जून 2026 पर्यंत दोषनिश्चिती न करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, शुक्रवारी ( दि. 15) सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीवेळी ॲड. प्रशांत नवगिरे यांनी उच्चन्यायालयाचा आदेश दाखल केला. त्यामुळे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीसाठी 16 जून तारीख दिली.

जिल्हा न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने 22 जून पर्यंत मनिषावर दोषनिश्चिती करु नये असे आदेश दिले आहेत.
- ॲड. प्रशांत नवगिरे, मनीषाचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT