Dr Shirish Valsangkar Case 
सोलापूर

Dr. Shirish Walsangkar death case: सुनावणीस सुरुवात होणार २० जुलैपासून

प्रसिध्द न्‍युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या मृत्यूप्रकरणातील सुनावणीस सुरुवात होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रसिध्द न्‍युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या मृत्यूप्रकरणातील सुनावणीस सुरुवात होणार आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्‍या वतीने बुधवारी (दि.१) न्‍यायवैदिक प्रयोगशाळेचा अहवाल (फॉरेन्‍सिक रिपोर्ट) न्‍यायालयात सादर करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे.

डॉ. शिरीष यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी राहत्‍या घरी स्‍वतःवर गोळी झाडून आत्‍महत्‍या केली. या खटल्यात संशयीत आरोपी म्‍हणून एसी इन्‍स्टिट्युट ऑफ न्‍युरो सायन्‍स म्‍हणजेच वळसंगकर हॉस्‍पिटल मधील कर्मचारी मनिषा मुसळे माने हिच्‍या विरोधात न्‍यायालयात खटला सुरु आहे. मनिषाचा दोषमुक्‍तीचा अर्ज न्‍यायालयाने फेटाळल्यानंतर आता या खटल्याच्‍या सुनावणीस सुरुवात झाली आहे. बुधवारी सरकार पक्षाच्‍या वतीने न्‍यायालयात न्‍यावैदिक अहवाल सादर करण्यात आला.

डॉ. शिरीष यांनी आत्महत्येवेळी परिधान केलेला शर्ट, पॅन्ट, बाथरूम मधील रक्ताने माखलेले टॉवेल, नॅपकिन, कपड्याचा तुकडा व सिगाराटीचे टोटके हे जप्त करून त्यावरील रक्ताबाबतची तपासणी करण्याकरिता ते फॅारेन्‍सिक सायन्‍स लॅबोरेटरी, मुंबई येथे पाठविण्यात आले होते. तेथील अहवाल प्राप्‍त झाला असून तो न्‍यायालयात सादर करण्यात आला.

परंतु हा अहवाल अहवाल अपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. या खटल्यात सरकारच्‍या वतीने ॲड. प्रदीपसिंह रजपूत, मूळ फिर्यादीच्‍या वतीने ॲड. शशी कुलकर्णी तर आरोपीच्‍या वतीने ॲड प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत. हा खटला प्रमुख जिल्‍हा न्‍यायाधिश मनोज शर्मा यांच्‍या न्‍यायालयात सुरू असून २० जुलै रोजी पुढची तारीख देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT