सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष सोमवारी (दि. 9) म्हणणे सादर करणार आहे. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल.
मनीषाच्या जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी सरकार पक्षाने आत्तापर्यंत तीन वेळा मुदत वाढवून घेतली. म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे नाहीत ती मिळविण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण सरकार पक्षाने न्यायालयात दिले. 28 एप्रिल रोजी म्हणणे मांडण्याची शेवटची तारीख होती. परंतु सरकार पक्षाने पुन्हा तारीख मागितली. 8 जूनपर्यंत न्यायालयास सुट्टया आहेत. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश कटारीया यांनी 9 जून तारीख दिली. त्यानुसार आता सरकार पक्ष सोमवारी म्हणणे मांडणार आहे. या दिवशी सरकार पक्षाने पुन्हा मुदत घेतल्यास मनीषाच्या वकिलांकडून त्यास हरकत घेण्यात येणार आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस येत्या 18 तारखेला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन चार्टशीट दाखल करण्यासाठी तयारी करीत आहे. चार्टशीट दाखल होईपर्यंत मनीषाला जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रयत्न करीत असल्याचे दिसते.