पेटंट मिळालेले जॅकेट. Pudhari Photo
सोलापूर

Heart attack diagnosis patent | हार्ट अ‍ॅटॅकचे निदान करणार्‍या डॉ. परळेंच्या संशोधनास पेटंट

जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी मोबाईलवर पाठवता येणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हॉर्ट अ‍ॅटॅकचे निदान करणार्‍या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे. त्यास भारत सरकारकडून नुकतेच पेटंट मिळाले आहे. या पेटंटसाठी डॉ. परळे यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये अ‍ॅप्लिकेशन केले होते.

हृदयरोगामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हेदेखील प्रमुख कारण आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी; मात्र गाव-खेड्यात ईसीजी मशिन देखील उपलब्ध नसतात. अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉ. परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे. हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे.

हार्ट अ‍ॅटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 ङएऊ एउॠ फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यांनंतर या उपक्रमास नुकतेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असल्याचे डॉ. परळे यांनी सांगितले. जवळपास 1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर असे पॉईंटस् शोधण्यात आले. 2020 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॉजी कॉन्फरन्स मध्ये मांडण्यात आले. यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे पॉईंट्स नेहमीच्या ईसीजी पॉईंट्स सारखेचं असल्याचे सिद्ध केले. ही ह्या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती, अशी माहिती डॉ. परळे यांनी दिली.

माझ्या तीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवानुसार अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर केवळ ईसीजी वेळेत झाला नाही किंवा ईसीजी व्यवस्थित इंटरप्रिएट करता आला नाही त्यामुळे जीव गमवावा लागलाय. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे मला असे वाटले की, रुग्णांना घरी ईसीजी करता आला, तर मदत होऊ शकते, या संकल्पनेतून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे.
डॉ. गुरुनाथ परळे, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT