सोलापूर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ समस्या मांडल्या नाही. तर त्यावर उपाययोजना केल्या आहेत. पाण्याच्या नियोजनावर त्यांनी भर दिला. नदीजोड प्रकल्पाचे जनक डॉ. आंबेडकर आहेत. असे मत व्याख्याते प्रा. सुहास उघडे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद मराठा सेवा संघाच्या वतीने डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. उघडे बोलत होते.
डॉ. आंबेडकरांनी समतेचा विचार दिला. त्यांचे प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. जिल्हा परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्यात येईल. तसेच गुणवंत कर्मचार्यांसाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, स्मिता पाटील, इशाधिन शेळकंदे, कादर शेख, प्रसाद मिरकले, मिनाक्षी वाकडे, सुलोचना सोनवणे, संतोष कुलकर्णी, संजय धनशेट्टी, अरूण क्षीरसागर, अविनाश गोडसे, सचिन जाधव, अनिल जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याण श्रीवस्ती तर हेमलता होटकर यांनी आभार मानले.
दोनच राजे इथे गाजले. या गीतांनी कार्यक्रमात बहार आणली. माऊलीची माया होता. माझा भीमराव! तसेच जन्मास आले भीमबाळ..! माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमाण..! किती शोधला असता भीम नोटांवर. या भीमगीतांनी जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. मराठा सेवा संघाच्या वतीने स्वानंद परिवाराच्या पहाडी आवाजात भीमगीतांचे सादरीकरण केले.