न्यूरोसर्जन डॉ. शिरीश वळसंगकर Pudhari Photo
सोलापूर

डॉ. वळसंगकर आत्‍महत्‍याः हॉस्‍पिटलमधील महिला प्रशासकीय अधिकारी अटकेत !

Solapur Crime News | सुसाईड नोट सापडली : संबधित महिलेस पोलिस कोठडी.

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोतज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्‍यान मनीषा मुसळे माने हीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांचा पोलिस कोठडी मिळाली आहे.

डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास घरी बाथरूममध्ये स्वतःच्या पिस्टल मधून डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण सोलापूर हादरले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पिस्टल जप्‍त केले. तपासालाही सुरूवात केली होती. शनिवारी (दि. 19) सायंकाळी चारच्या सुमारास डॉ. वळसंगकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. अश्‍विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डॉ. वळसंगकर यांनी हॉस्पिटलमधील कर्मचारी मनिषा मुसळे माने हिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर डॉ. वळसंगकर यांची सुसाईड नोटही सापडली. यामध्ये मनिषा मुसळे-माने हिच्यामुळे आत्महत्या केल्याचे नमूद आहे. त्यानंतर पोलीसांनी मुसळे-माने हिच्या विरोधात सदर बझार पोलीस स्टेशन येथे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक केली.

महिलेने धमकी दिल्याने होते तणावात

डॉ. शिरीष वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रहही होता. पण, रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून काढले होते. पण नंतर या महिला कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

संबधित महिलेस पोलिस कोठडी

डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्‍या मनीषा मुसळे-माने (वय 45) या हॉस्पिटलमधील कर्मचारी महिलेला रविवारी (दि. 20) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. मुसळे-माने हिच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 19) गुन्हा दाखल केला होता. तिला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा न्यायालयाच्या परवानगीने अटक केली. रविवारी (दि. 20) सकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर हे नेमके प्रकरण काय आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT