सोलापूर

Maharashtra MLC Election : सोलापुर जिल्ह्यात पदवीधरांचे ७१ तर शिक्षकांचे ८९ टक्‍के मतदान

सोलापुरात चुरशीने मतदान, रात्री उशिरा मतपेट्या पुणेकडे रवाना; मंगळवारी होणार मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारासंघाठी सोलापूर जिल्ह्यातून ७१.६ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातून ८९ टक्‍के चुरशीने मतदान झाले. मंगळवारी (दि.२७) पुण्यात मतमोजणी होणार आहे.

पदवीधरसाठी ११७ तर शिक्षक मतदार संघासाठी ७६ असे एकूण १९३ मतदान केंद्रावर शुक्रवारी (दि. २३ ऑक्‍टोबर) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, रात्री उशिरा मतपेट्या मतमोजणीसाठी पुण्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ४९ हजार ७२२ नोंदणी होती. यातील ३५ हजार ५९१ जणांनी मतदान हक्क बजावला. शिक्षक मतदार संघासाठी १५ हजार ३०३ जणांनी नोंदणी केली होती. यात १३ हजार ६१८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दोन वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी ४५.२१ टक्‍के म्हणजे २२४७७ मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी ५८.८३ टक्के म्हणजे ९००३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सिद्धेश्वर प्रशाला आणि नॉर्थकोट येथील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

यंदा मतदानाचा टक्का वाढला

मागील म्हणजे सन २०२० मध्ये झालेल्या पदवीधर मतदार संघासाठी ५३ हजार ८१३ पैकी ३३ हजार ५२० जणांनी मतदान केले. म्हणजे ६२.२९ टक्‍के मतदान झाले होते. यंदा ७१.६ टक्के मतदान झाले. सन २०२० मध्ये शिक्षक मतदार संघासाठी १३ हजार ५८४ पैकी ११ हजार ५५८ मतदारांनी म्हणजे ८५.०९ टक्के मतदान झाले होते. यंदा ८९ टक्के मतदान झाले.

पदवीधर मतदार संघासाठी तालुकानिहाय एकूण मतदार संख्या, झालेले मतदान आणि कंसात टक्‍केवारी

बार्शी - ३९९९ - ३३९९ (८५), अक्कलकोट-२०२६-१७१२ (८४.५), मंगळवेढा-२३९५-१८६५ (७७.०९), माळशिरस - ७४१७-५४८६ (७४), सांगोला-४२७१-३०३३ (७२.७), पंढरपूर -६२८७-४५२९ (७२), मोहोळ -३९४६-२७९६ (७०.०९), दक्षिण सोलापूर-१६७८-११६८ (६९.६), माढा-४८०२-३१८० (६६.०२), करमाळा- ३२६८-२१३४ (६५.०३), उत्तर सोलापूर- ९७३३-६२८९ (६४.०६), एकूण -४९७२२-३५५९१ (७१.६)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT