सोलापूर : राज्यात एक लाख 70 हजार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत. त्यांच्या अडीअडचणींसाठी 8 फेबु्रवारीला सोलापुरात बैठक होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारी मंडळाच्या पुढाकाराने राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची बैठक घेण्यात येत असून, शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. पेन्शन विक्रीचे दिलेले रक्कम सरकारने वयाच्या 75 वर्षापर्यंत चौपट परतफेड करून घेतात. मात्र, निवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना तेवढी रक्कम मिळत नाही. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणात तफावत आहे.
पेन्शन ही म्हातारपणाची आधाराची काठी आहे. सरकारला जशी लाडकी बहीण महत्वाची तशी देश घडविणारा गुरूजी सुध्दा मह्त्वाचे आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार असून, त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.