Annabhau Sathe (Pudhari File Photo)
सोलापूर

Annabhau Sathe: अण्णाभाऊ साठेंना डी.लिट देण्यास विलंब का?

सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत जोरदार खडाजंगी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट अधिसभेत सोमवारी मानद पदव्यांच्या मुद्द्यावरून कुलगुरू आणि सदस्यांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. बैठकीत पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्याचा ठराव मांडण्यात आला. यावेळी डॉ. आदटराव यांनी 2020 सालच्या प्रलंबित ठरावाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लिट पदवी देण्याचा ठराव पाच वर्षांपूर्वीच सिनेटमध्ये मंजूर झाला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा सवाल सदस्यांनी विचारला. यावेळी कुलगुरूंनी भूतकाळात जाण्याची गरज नाही, पुढच्या वेळी विचार करू, असे उत्तर दिल्याने सभागृहात पाऊण तास जोरदार गदारोळ झाला. यावेळी शरदचंद्र पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मानद पदवी देण्याचे प्रस्ताव चर्चेत आले.

विद्यापीठ प्रशासन महापुरुषांच्या सन्मानाबाबत दुजाभाव करत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. अखेर, अण्णाभाऊंच्या नावाची पुन्हा शिफारस करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्यानंतर वातावरण शांत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT