सोलापूर

Solapur News: देगाव स्मशानभूमीतील गॅस दाहिनी कार्यान्वित

स्थायी समिती सदस्य तथा प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देगाव स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचा प्रश्न उपस्थित करताच प्रशासन खडबडून जागे झाले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : स्थायी समिती सदस्य तथा प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देगाव स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचा प्रश्न उपस्थित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर तातडीने हालचाली करून देगाव स्मशानभूमीतील गॅस दाहिनी बुधवारपासून कार्यान्वित केली. गॅस दाहिनीचा उपयोग केल्यास अंत्यसंस्काराचा खर्चही कमी येणार असून पर्यावरणाचा समतोलही राखण्यास मदत होणार आहे.

बुधवारी सकाळी नगरसेवक गणेश वानकर यांनी देगाव येथील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत या गॅस दाहिनीच्या ठिकाणास भेट दिली. गॅस दाहिनी कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे, याची इत्यंभूत माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गणेश वानकर आणि ग्रामस्थांना दिली. गॅस दाहिनी परिसरात काही कामे अद्याप करावयाची बाकी आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना वानकर यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी देगावचे संतोष दांडगे, प्रभाकर नाना कोठे, सुधाकर भाऊ काळे, शिवाजी जाधव, योगेश कोळी, अभिजित सावकार सुपाते, अमर कस्तुरे, संभा वाघ, गोटू ताकमोगे, नितीन कोठे, योगी कोळी, अरुण भैया जाधव व विद्युत विभागाचे अभियंता प्रतीक कोल्हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT