Solapur News file photo
सोलापूर

Solapur News: सासूला मारण्याचा सुनेचा डाव फसला, नवऱ्याचा बळी गेला

सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने रचलेला भयानक कट तिच्याच अंगलट आला असून, सासूऐवजी स्वत:च्या पतीलाच प्राण गमवावे लागले.

मोहन कारंडे

Solapur News:

पंढरपूर: सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने रचलेला भयानक कट तिच्याच अंगलट आला असून, सासूऐवजी स्वत:च्या पतीलाच प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे. अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य एकाला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

उंबरगाव येथील सारिका लोहार हिचे अनैतिक प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या सासूला कायमचे संपवण्यासाठी सारिकाने एक भयानक कट रचला. १६ जानेवारी रोजी तिने पिण्याच्या पाण्यात विषारी औषध मिसळले होते. हे पाणी सासूला पाजून त्यांचा जीव घेण्याचा तिचा इरादा होता. मात्र, नियतीचा खेळ काही वेगळाच होता. सासूऐवजी सारिकाच्या पतीनेच ते विषारी पाणी प्यायले. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच पतीची प्रकृती खालावली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

चित्रपटालाही लाजवेल असा हा प्रकार

सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटत होता. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांवरून हा मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास केला असता, पत्नी सारिका हिनेच सासूला मारण्यासाठी पाण्यात विष कालवले होते, हे निष्पन्न झाले. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा हा प्रकार उंबरगावात घडल्याने संपूर्ण पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांच्या मोहापायी एका महिलेने स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेतला असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT