प्रातिनिधिक छायाचित्र.  file photo
सोलापूर

चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले

डोळ्यात मिरचीपूड टाकून सहा लाख 72 हजारांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मुंबईकडून हैदराबादकडे निघालेल्या पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवत, पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दोन अज्ञात चोरट्यांनी पती-पत्नीकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 6 लाख 72 हजार रुपयांचा माल पळवून नेल्याची घटना दि. 19 एप्रिल रोजी रात्री सव्वाएक वाजण्याच्या दरम्यान मोहोळ-सोलापूर महामार्गावर अंजनी हॉटेलजवळ घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोनानिशांत सुधीरकुमार कंचरला (रा. मलमपेठ, जि. मेडचल, मलकागिरी तेलंगणा) हे मुंबई येथे एका बँकेत कार्यरत आहेत. बँकेला तीन दिवस सुट्टी असल्याकारणाने ते आपल्या मूळ गावी कारमधून पत्नीसमवेत निघाले होते. मुंबईपासून ड्रायव्हिंग करून थकल्यामुळे शनिवारी रात्री 1.10 वा. च्या सुमारास अंजनी हॉटेलसमोर गाडी थांबवून ते खाली उतरून फ्रेश होत असताना, अचानक पाठीमागून एक जण आला व त्याने कंचरला यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, तर दुसर्‍यानेही त्यांच्या पत्नीला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसुत्र, दुसरे सोन्याचे मनी मंगळसुत्र, सोन्याचे ब्रेसलेट, कानातील डायमंड रिंग ,डायमंडची हातातील अंगठी, दोन हाताचे बोटातील अंगठया व 5 हजार 100 रूपये रोख रक्कम असा एकुण 6 लाख 72 हजार 497 रूपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. व गाडी घेऊन तेथून निघून जाण्यास सांगितले.

त्यामुळे घाबरलेले कंचरला दांपत्य सोलापूर येथील एका हॉटेलमध्ये गेले. व त्यानंतर दि. 20 एप्रिल रोजी मोहोळ येथे पोलीस ठाण्यात येऊन दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT