सोलापूर : भिशीच्या माध्यमातून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती पत्नीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
श्री ओम साई फायनन्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा (दोघे रा. खुशी रेसीडेन्सी, गितानगर, थोरात हॉस्पिटलजवळ, सोलापूर) यांनी 2020 ते 24 दरम्यान भिशी चालवून अनेकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवले. त्याला बळी पडून 131 ठेवीदारांकडून तब्बल दोन कोटी 69 लाख 19 हजार रुपयांच्या ठेवी घेतल्या. पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण आवार यांच्यासह 131 ठेवीदारांनी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून पती पत्नी पळून गेले होते. वर्षभर त्यांचा शोध लागत नव्हता.