Devendra Kothe Pufhari
सोलापूर

Devendra Kothe | स्मार्ट मीटरमधील चुका दुरुस्त करा : आ. देवेंद्र कोठे

पावसाळी अधिवेशनात केल्या विविध मागण्या

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विजेच्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांचे वीज बिल दुप्पट, तिप्पट येत आहे, याकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी गुरुवारी पावसाळी अधिवेशात शासनाचे लक्ष वेधत तांत्रिक चुका दुरुस्त करण्याची मागणी केली. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवले आहे त्यांना दुपटीने, तिपटीने बीज बिल येत आहे. अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाने सविस्तर स्पष्टीकरण द्यावे.

स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक चुका असल्यास सरकारने हे मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. तरीही मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून स्थगिती दिली आहे. अशा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि तांत्रिक अनुभव असणाऱ्या अभियंत्यांना कायम करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेहमीच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य असते. याच भूमिकेचे पालन करत नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीमुळे बसणारा आर्थिक भुर्दंड थांबावा याकरिता सभागृहात स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिल मुद्दा आणि अभियंत्यांचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. दोन्ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णयाची खात्री आहे.
- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT