सोलापूर : जिल्हा, ग्रामीण व महिला रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. गेले चार महिने त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधित कर्मचारी पुरवठादार कंपनीकडून पगार मिळत नाही तोपर्यंत काम करणार नसल्याचा इशाराच या कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून दिला आहे. तसेच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका येथील महिला, जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णांना बसला.
या कर्मचान्यांनी वेळावेळी थकलेल्या पगारासाठी कर्मचाऱ्यांनी निदर्शन आंदोलन करतांना कंपनीच्या व्यवस्थापनाला बोलूनही त्यांच्याकडून पगार देण्यास आले नाही. म्हणून, आंदोलनाचा हत्यार उपसावे . दरम्यान, याविषयी संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. या कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम रुग्णसेवेवर जाणवला.
रुग्णसेवेला प्राधान्य मात्र चार महिन्यांपासून पगार नाही
आम्ही कोणत्याही क्षणी रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देतो. त्यांच्यासाठी दिवसरात्र झटतो. तरीही, मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पर्यायाने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून जेव्हा पगाराची चौकशी करतो तेव्हा व्यवस्थापनाकडून समर्पक उत्तर मिळत नाही. अशा प्रकारच्या व्यथा अनेक महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.