मंगळवेढा : मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये 34 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मंगळवेढा शहरातील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या उपस्थितीत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. यावेळी खा. प्रणिती शिंदे या बैठकीस उपस्थित होत्या. मुलाखती घेताना जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, अर्जुनराव पाटील, सुरेश कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनीदेखील या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.
बैठकीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंढरपूरचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे, ॲड. सर्जेराव पाटील, ॲड. सुरेश कोळेकर, रवींद्र शिवशरण, शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले, बापूसाहेब अवघडे, नाथा ऐवळे, मारुती वाकडे, सिद्धेश्वर धसाडे, आयेशा शेख, कविता खडतरे, सत्तार इनामदार, संदीप पवार, सुनीता अवघडे हे उपस्थित होते.