Solapur Politics Pudhari
सोलापूर

Solapur Politics: नाट्यमय घडमोडीनंतर अखेर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

सूचकाने स्वाक्षरीविषयी ऐनवेळी घेतला ‘युटर्न’, भाजपची खेळी यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूरः विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी दिवशी, मंगळवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस विरूद्ध भाजपच्या शह-काटशहामध्ये अखेर काँग्रेस उमेदवाराचा अर्जच बाद झाला. यामुळे भाजपची खेळी यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी भाजपविरूद्ध घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सविस्तर वृत्त असे की, विधान परिषद निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. मात्र, मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सदरची स्वाक्षरी आपली नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामागे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराचा अर्जच बाद करण्याचा चंग बांधलेल्या भाजप नेत्यांच्या वरदहस्ताने खूप घडामोडी घडल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खूप नाट्यमय घडामोडी घडल्या.

नगरसेवक नागेश भोसले यांनी २० ते २५ समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेतली. भोसले यांनी बाँडवर लेखी देत स्पष्ट केले की, “काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांच्या अर्जावरील सूचकाची स्वाक्षरी आपली नाही.” यामुळे भाजपला आयती संधी मिळाली. यामुळे काँग्रेसच्या फत्तेपूरकर यांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी पुढे आली.

दरम्यान, काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जवरील सूचकाच्या स्वाक्षरीविषयी रात्री उशीरापर्यंत जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यापुढे सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंची मत-मतांतरे ऐकून घेत, भारतीय दंड संहितेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा निवडणूक अर्ज बाद ठरविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT