Devendra Fadnavis (Pudhari Photo)
सोलापूर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस उद्या सोलापुरात

'हरिभाई'च्या मैदानावर होणार जंगी सोहळा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (28 एप्रिल) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे. या अनुषंगाने हेरिटेज मंगल कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी शहर व जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दौऱ्याबाबत चर्चा केली.

सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती यावर भाजपला प्रथमच मोठे यश मिळाले आहे. महापालिकेत, जिल्हा परिषदेत बहुमताने सत्ता मिळवली आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यशाच्या शिलेदारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी आ. विजयकुमार देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. राजन पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री बार्शी येथे होणाऱ्या भगवंत महोत्सवासाठीही उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT