Clay jars 
सोलापूर

Clay jars: पाणी प्या गार , विक्रीला मातीचे जार

गुजराती मातीच्या जारला ग्रामीणसह शहरी भागात पसंती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचा पारा 43 अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. या रणरणत्या उन्हात घसा ओला करण्यासाठी नागरिक आता नैसर्गिक थंडाव्याकडे वळले असून, बाजारपेठेत गुजराती मातीचे जार क्रमांक एक ठरत आहेत. फ्रिजच्या पाण्यामुळे होणारा घसादुखीचा त्रास टाळण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही या माठांना मोठी पसंती मिळत आहे.

यंदा बाजारात काळा, लाल आणि विशेष नक्षीकाम केलेले असे तीन मुख्य प्रकार उपलब्ध आहेत. सोलापूरचे विक्रेते रवी रोहिटे यांनी सांगितले की, यंदा ग्राहकांचा कल प्रामुख्याने गुजराती मातीच्या जारकडे अधिक आहे. हे माठ दिसायला आकर्षक असून त्यातील पाणी दीर्घकाळ थंड राहते.

नळ बसवलेले जार वापरण्यास सोपे असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वच जण यंदा या माठांची खरेदी करत आहेत. तसेच रोपे लावण्यासाठी कुंडे व चिमण्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीचे भांडे बाजारात आले आहे.

थंडावा आणि सौंदर्य

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात आकर्षक नक्षीदार माठ दाखल झाले आहेत. कलेचा उत्तम नमुना असलेले हे माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, आकारानुसार 400 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नैसर्गिक थंडाव्यासाठी माठांना मागणी आहे.

अडीचशेपासून ते पाचशेपर्यंत

उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार बाजारात विविध माठ दाखल झाले आहेत. यामध्ये लाल माठ 300 ते 400 रुपयांपर्यंत, तर काळा माठ 250 पासून 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. दर्जेदार नक्षीकाम आणि नैसर्गिक थंडावा या माठांची वैशिष्ट्ये आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT