Solapur temperature pudhari photo
सोलापूर

Solapur temperature: तापमान 55 अंशांवर जाण्याची भीती निरर्थक

तप्त सोलापूर : मात्र दावे अप्रमाणित, अतिशयोक्तीपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सध्या सोलापुरचा पारा हा 44 अंशांवर पोहोचला असून, 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान, सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कोणत्याही व्यक्तीने (उघड्या आकाशाखाली) बाहेर जाऊ नये, तापमान 45 ते 55 पर्यंत जाऊ शकते, असे हवामान खात्याने सांगितले आहेत. अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये उष्णतेबद्दल भीती निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. परंतु सोलापूर जिल्हा प्रशासनाने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशा आवाहन केले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. कृपया सावध रहा आणि इतरांना माहिती द्या. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच नागरिक संरक्षण महासंचालनालयाचा हवाला देत 47 ते 55 दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल. कारमधून गॅस साहित्य, लाईटर, कार्बोनेटेड पेये, परफ्यूम व बॅटरी असलेली उपकरणे, कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा कारची इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा, टायर जास्त फुगवू नका, विशेषतः प्रवासादरम्यान विंचू आणि साप यांच्यापासून सावध रहा, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात.

पुरेसे पाणी प्या. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका. वीजमीटरवर जास्त भार टाकू नका. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरा, विशेषतः उन्हाळ्यात. दोन ते तीन तासांनी 30 मिनिटे विश्रांती घ्या, अशा प्रकारचे पोस्ट व्हायरल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT