करमाळा : स्वस्तात सोने देतो म्हणून दीड लाखाला गंडवणार्यांना रोख रक्कम व मोटारसायकल सह तिघांना 12 तासांत बेड्या ठोकल्या असून करमाळा न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सविता छगन शिंदे, छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेश्वर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे (सर्व रा. निमगाव ता. करमाळा, जि. सोलापूर) असे बेड्या ठोकलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. ज्ञानेश्वर शामराव टेकाळे (मूळ रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर सध्या रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.यामधील सविता छगन शिंदे ही संशयित महिला आरोपी फरार असून अटक केलेल्या तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी करमाळा न्यायालयाने दिली असून या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे करीत आहेत.