पंढरपूर : चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार, दि. 29 मार्च रोजी लाखो वैष्णवांच्या उपस्थित साजरा होत आहे. दशमी दिवशी सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शन रांगेतही लाखावर भाविक उभे आहेत.
दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. दर्शन रांगेत त्याचबरोबर मंदिर परिसरात शेडनेटची सावली तयार करण्यात आल्यामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढते तापमानामुळे भाविकांची संख्या घटली आहे. यातच शिखर शिंगणापूरची देखील यात्रा सुरु असल्याने भाविक विठ्ठलाचे दर्शन घेवून शिखर शिंगणापूरला जात असल्याने पंढरपूरची चैत्री वारी धावती वारी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.