सोलापूर ः सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वसंत विहार परिसरात रविवारी (दि. 20) पहाटेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेर्यात चड्डी गँग कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मेट्रो सिटीत चड्डी गँग सक्रिय आहे. आता सोलापुरातही अशी चड्डी गँग सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी पहाटे वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी आणि धानम्मा नगर परिसरात या गँगचा वावर आढळून आला आहे. चार चोरटे काळा टी-शर्ट, चड्डी घालून आणि चेहरा पूर्णपणे झाकून परिसरात फिरताना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चड्डी गँग आढळली. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पोलिसांनी चड्डी गँगवर तत्काळ आळा घालण्याची मागणी होत आहे.
शहरातील वसंत विहार परिसरात काही लोक संशयास्पद हालचाल करताना आढळून आले आहेत. त्यासाठी या परिसरात नाईट राऊंड वाढविण्यात आले आहेत. त्यांचे फोटो मिळाले असून त्याद्वारे तपास सुरू करण्यात आला आहे.महादेव राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी