Cervical cancer File Photo
सोलापूर

Cervical cancer: गर्भाशय मुख कर्करोगाला रोखणे शक्य

नवी एचपीव्ही लस प्रभावी, निदान व उपचार ठरतोय लाभदायक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महिला वर्गामध्ये स्तनासह गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. पण याला रोखून प्रतिबंध करणे आता शक्य झाले असून यासाठी अत्याधुनिक व नव्याने विकसित केलेली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) ही प्रतिबंधात्मक लस प्रभावी ठरली आहे. शालेय वयातील मुलींना एचपीव्ही लस दिल्यास भविष्यातील त्याचा धोका टाळता येऊ शकतो. तसेच लसीकरण करून न घेतलेल्या आणि वयाची तिशी ओलांडलेल्या महिलांना नियमित तपासणीसह उपचार घेतल्याने हा आजार टाळता येणे शक्य आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा त्रास भविष्यात होणार नाही याची काळजी पालकांनाच घ्यावी लागणार आहे. नव्याने विकसित केलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)मुळे याचा प्रतिबंध होतो. 16 व 18 या क्रमांकाच्या विषाणूंच्या जाती ह्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. या दोन्ही जातींना प्रतिबंध करण्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) ही लस प्रभावीपणे काम करते आहे. म्हणून ती लस शाळकरी मुलींना दिली जात आहे. ही लस दिल्यास आयुष्यभर त्यांच्या आरोग्याचे या आजारापासून संरक्षण होणार आहे.

वयाची तिशी पार केलेल्या महिलांमध्ये पॅप स्मिअर टेस्ट ही पारंपरिक कर्करोग तपासणीची पध्दत असून ती आता एचपीव्ही व डीएनए चाचणी ही अत्यााधुनिक, अधिक अचूक पध्दतीची तपासणी सध्या उपलब्ध आहे. या तपासणीच्या चाचणीतून आजाराची लक्षणे व निदान होऊन वेळेत उपचार घेता येतो व कर्करोगापासून सुटका मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT