सोलापूर : मध्य रेल्वेच्या प्रशासनाने झिरो स्क्रॅप स्टेटस साध्य करण्यासाठी भंगाराची विक्री केली आहे. यातून मध्य रेल्वेला पाच विभागातून 459.52 कोटी तर सोलापूर विभागाला 34. 92 कोटींचा महसूल मिळाला आहे. रेल्वेने गत मार्च अखेरपर्यंतच्या 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्री केली. त्याचा मोठा महसूलही मिळाला आहे. गेल्या दोन वर्षातील ही मोठी भंगार विक्री ठरली आहे. यातून सोलापूर विभागालाही चांगला महसूल मिळाला आहे.
विविध स्थानक व स्थानकाबाहेर पडलेल्या अनेक प्रकारच्या भंगार विक्रीतून महसूल मिळवितात. त्याचे मालमत्तेत रूपांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. गत 31 मार्च अखेरपर्यंत रेल्वेकडून 2025-26 या आर्थिक वर्षात विक्री केलेल्या भंगारातून 459.52 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही विक्री रक्कम 2023-24 नंतरची मोठी आहे. रेल्वे बोर्डाने 450 कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यंदा दोन वर्षांतील जास्त रक्कमेच्या भंगाराची विक्री झाली आहे. रेल्वेच्या भांडार विभागाने पाचही विभागांत पडून राहिलेल्या भंगाराचा शोध घेतला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोहीम हाती घेतली.
केंद्रिय पद्धतीने भंगाराची विक्री केल्याने त्यात वाढ झाली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या पाच विभागातील भुसावळने सर्वाधिक 105.39 कोटींच्या भंगाराची विक्री केली आहे. याशिवाय वापरात नसलेले व कार्यरत असलेले एक रोटाटेक प्रिंटिंग मशीन भंगारात टाकण्याचे टाळत ती 8.75 कोटीला नाशिक प्रिंटिंग प्रेसकडे हस्तांतरण केले आहे. यामुळेही महसुलात अधिक वाढ मिळाली आहे.
विविध श्रेणींतील भंगार विक्री
लोह-धातू भंगार : 31, 298 मेट्रिक टन,
लोह व्यतिरिक्त-धातू भंगार : 3,616 मेट्रिक टन,
रेल्वे रूळ भंगार : 47,502 मेट्रिक टन,
स्लीपर्स : 2,65,625 नग,
रोलिंग स्टॉक : 50 लोकोमोटिव्हज,
78 डबे आणि 137 वॅगन्स अशा प्रकारे विविध श्रेणींतील भंगार विक्री करून 459.52 कोटी रेल्वेला मिळाले आहेत.