Census Duty File Photo
सोलापूर

Teachers Honorarium: जनगणना केलेल्‍या शिक्षकांचे रखडले मानधन

उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत १५ मे ते १५ जून दरम्‍यान जनगणना केलेल्‍या शिक्षकांचे मानधन रखडले आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत १५ मे ते १५ जून दरम्‍यान जनगणना केलेल्‍या शिक्षकांचे मानधन रखडले आहे. मानधन तत्‍काळ मिळावे, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.

जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास पाच हजार शिक्षकांचे मानधन प्रलंबित आहे. ते तत्काळ अदा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जनगणना हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून, शासनाच्या आदेशानुसार अनेक शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीतही जनगणनेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, काम पूर्ण करूनही संबंधित शिक्षकांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तत्काळ मानधन देण्याची मागणी होत आहे.

एका शिक्षकास मिळणार दहा हजार

जनगणना काळात शिक्षकांना प्रशिक्षणाचे १२०० रुपये आणि जनगणनेचे नऊ हजार रुपये असे एकूण दहा हजार २०० रुपये मानधन एका शिक्षकाला मिळणार आहे. मात्र, जुलै महिना संपत आला असून, अद्यापही मानधन न मिळाल्‍याने शिक्षकांतून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

शासनाने सोपविलेली जनगणनेची जबाबदारी शिक्षकांनी पूर्ण केली आहे. शिक्षकांना तत्‍काळ मानधन द्यावे, यासाठी जिल्‍हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. जनगणना कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांचे प्रलंबित मानधन कोणताही विलंब न लावता तातडीने अदा करावे; अन्‍यथा आंदोलनाचा मार्ग स्‍वीकारावा लागेल.
- सुजित काटमोरे, जिल्‍हाध्यक्ष, शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT