Grain Pudhari
सोलापूर

Census questions: तुम्ही जेवणात धान्य कुठले वापरता?

तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, मका की इतर, जनगणनेत विचारले जाणारे प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात जनगणनेला दि.16 जूनपासून प्रारंभ झाला आहे. या जनगणनेत घर यादी आणि घरगणना प्रश्नावलीमध्ये एकूण 34 प्रश्न आहेत. यात जेवणात तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, मका किंवा इतर कोणत्या धान्याचा समावेश करता, याबाबत माहिती विचारली जाणार आहे.

34 प्रश्नावलीत एक ते आठ प्रश्न हे घराची रचना आणि वापर या संबंधित आहेत. तर नऊ ते सोळा क्रमांकातील प्रश्न कुटुंबाची माहितीबाबत असतील. सतरा ते चौतीस क्रमांकाचे प्रश्न हे सुविधा आणि मालमत्ता संदर्भातील विचारले जाणार आहेत. घराच्या रचनेतील प्रश्नावलीत ओळ क्रमांक, इमारत क्रमांक, जनगणना घर क्रमांक, बांधकामाचे मुख्य साहित्य, घर मातीचे, लाकूडचे की पक्क्या विटाचे, दगडाचे की सिमेंटचे याबाबतीत ती माहिती विचारली जाणार आहे.

भिंतीचे मुख्य साहित्य छताचे आहे. गवत, बांबू, लाकूड, प्लास्टिक, सिमेंट, विटाचे आहेत याबाबत प्रश्न विचारले जाणार आहे. घराचा वापर निवासी, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, प्रार्थनास्थळ याबाबत प्रश्न विचारले जाणार आहे. घराची स्थितीत प्रश्नावलीत चांगली राहणे योग्य की मोडकळीस झालेले असे प्रश्न विचारले जाणार आहेत.

कुटुंबाच्या माहितीमध्ये कुटुंब क्रमांक, कुटुंबात एकूण राहणाऱ्या व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, घराचा मालकी हक्क, खोल्यांची संख्या, कुटुंबात राहणारी विवाहित जोडपी याची माहिती विचारली जाणार आहे. सुविधा व मालमत्ता अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता, प्रकाशाचे स्रोत याबाबतची माहिती घेतली जाईल.

या जनगणनेमध्ये विविध प्रकारच्या प्रश्नांबरोबरच शौचालयाची उपलब्धता, प्रकार, सांडपाणी याचीही माहिती संकलित होईल. रेडिओ ट्रांजिस्टर, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, टेलिफोन, मोबाईल, सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने कुटुंबात असलेली वाहने याची माहिती विचारली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT