सोलापूर : अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या प्रवेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित शैक्षणिक संस्थेत सादर करणे बंधनकारक केला आहे. सहा महिन्यांत ती जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास आरक्षित प्रवर्गातील प्रवेश रद्द ठरणार आहे. यासाठी या पुढील काळात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.
यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील वैद्यकीय, अभियांत्रिकी व शास्त्र शाखेच्या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय व तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिनांक पासून सहा महिन्यांच्या आत संबंधित शैक्षणिक संस्थेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकार आहे. प्रवेशानंतरच्या सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरवण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रवेश घेतलेल्या दिनांक पासून सहा महिन्याची मुदत वाढ ही अंतिम असेल.
येणाऱ्या काळातील शैक्षणिक सत्रात तांत्रिक वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी व बारावी या इयत्तेत शिक्षण घेतांनाच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित विभागीय जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र साधारण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश आपोआप रद्द होईल. यासाठी, येणार्या काळात पालक व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दक्ष राहणे आवश्यक राहील.
जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल्यासाठी विद्यार्थी व पालकांना कार्यालयाला खुप चकरा माराव्या लागतात. कार्यालयातील यंत्रणेकडून प्रस्ताव स्वीकारतांनाच पडताळणीचा प्रस्ताव पूर्ण पाहावी. व, त्यात कमी असलेल्या कागदपत्राची सूचना द्यावी, असे प्रस्ताव स्वीकारल्यास विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास वाचू शकेल.- रेखा सोनकवडे, जिल्हाध्यक्षा महिला सुरक्षा समिती