सोलापूर : कोणत्याही राज्यातील कुठल्याही रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमींवर यापुढे दीड लाख रुपये पर्यंतच्या उपचाराचा खर्च हा शासनाच्या कॅशलेस योजनेतून दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या कॅशलेस उपचार पध्दतीची पंतप्रधान राहत योजना देशातील सर्वच राज्यात लागू केली जाणार आहे. या योजनेची नव्याने घोषणा व त्याची अंमलबजावणी सुध्दा लवकरच केली जाणार आहे. सध्या, ही योजना सात राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात आहे.
लहान वा मोठ्या अपघातात एखादा जखमी हा गंभीर व किरकोळ झाला तरी सुध्दा त्या जखमीला सरकारच्या कॅशलेस योजनेतून उपचार देणाऱ्या या योजनेची अधिसूचनाही काढली जाणार आहे. ही योजना देशपातळीवर असणार असून आजच्या घडीला ती सर्वच राज्यांत लागू करण्यात आली नाही.
देशभरात कुठल्याही रस्त्यावर अपघात झाल्यास या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात नेले किवा जखमी स्वतः जरी गेला आणि त्यांना संबंधितांकडून वेळेत उपचार मिळाला तर जखमीचे प्राण वाचू शकतात. यापुढील काळात अपघातातील जखमी हा कोणत्याही रुग्णालयात जाऊन ॲडमिट झाला की त्या जखमीवर सात दिवसांसाठी दीड लाख रुपये पर्यंतच्या खर्चाचा वैद्यकीय उपचार कॅशलेसच्या माध्यमातून मिळणार आहेत. अपघातातील गंभीर जखमींचे प्राण वाचवण्यात रूग्णालयाची महत्त्वाची भूमिका असते. रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वेळेत उपचाराची गरज निर्माण होते. या योजनेत अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांचेही दखल घेतली आहे.