Kidnapping Case Pudhari
सोलापूर

Kidnapping case: मुलीचे अपहरण करून विनयभंग

दोघांवर गुन्हा दाखल; दोघांना न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : शेताकडे चालत जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे दोन तरुणांनी जबरदस्तीने कारमधून अपहरण करून तिला बार्शी व परिसरात कारमध्ये फिरविले. तिचा विनयभंग केला. लग्नासाठी दमदाटी केली. त्याबरोबर तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला.

किरण चंद्रकांत शिंदे व महेश उपाशे (दोघे रा. नारी, ता. बार्शी) अशी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश विक्रम सिंह मांडे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. तरुणीला शाळेत जाणेस उशीर झाल्याने ती एकटी पायी चालत गावातून शेतात जात असताना सकाळी 09:30 वा.चे सुमारास रस्त्यावर पाठीमागून एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी वेगात माझेजवळ आली. त्यातून किरण शिंदे व महेश उपाशे हे दोघे गाडीतून खाली व जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसविले. पुढे गेल्यावर महेश उपाशे हा गाडीतून खाली उतरला.

शिंदे याने गाडी बार्शीपासून काही अंतर कुडूवाडी रोडला नेली. तुझ्याबरोबर लग्न करतो असे म्हणाला, मुलगी वारंवार विनवणी करून सांगत होती की, अजून शाळा शिकायची आहे, तुझ्याबरोबर लग्न करायचे नाही, असे म्हणताच किरण शिंदे याने हाताने अंगावर मारहाण केली. लग्नाला तयार झाली नाहीतर तर तुझे घरातील आई, बहीण यांना जिवंत ठार मारतो, अशी धमकी दिली. यानंतर पीडितेने कशी बशी सुटका करून घेतली. नंतर बार्शी बस स्थानक व तेथून गाव गाठले,असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT