Pudhari Photo
सोलापूर

Car Theft Case: कारचोरी करणारा आंतरराज्‍य चोरटा जेरबंद

पाच गुन्‍हे उघडकीस, चार कार केल्या हस्‍तगत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरसह राज्‍यात कारचोरी करणाऱ्या आंतरराज्‍य चोरट्यास फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्‍या गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने जेरबंद केले. समद मेहमूद शेख (वय ३२, रा. निझामाबाद, ) असे त्याचे नाव आहे. त्‍याच्‍याकडून पाच गुन्‍हे उघडकीस आले असून चार कार हस्‍तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सलग १५ दिवस बाहेर राहून तपास करीत तेलंगणातील निझामाबाद येथे कारवाई केली.

सोलापुरातील अवंती नगर येथील सूर्यभान पाटील यांची कार (एम.एच. १३ डी.ई. ३०८४) चोरीला गेली होती. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी या गुन्‍ह्याचा जलद तपास करण्याच्‍या सूचना सहा. पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना दिल्या होत्‍या. त्‍या अनुषंगाने क्षीरसागर यांच्‍या पथकाने तपास सुरु केला.

गुन्‍हा घडला त्‍यावेळी पहाटे एक लाल रंगाची कार लांब थांबली आणि त्‍यातून आलेल्या चोरट्यांनी कार चोरल्याचे स्‍पष्ट झाले. ही कार उमरग्याकडे गेल्याचे सीसीटीव्‍हीत दिसले. त्‍यांनी प्रत्‍येक टोल नाका चुकवून आणि गाडीचा नंबर प्‍लेट बदलून चलाखीने कार नेल्याचे दिसून आले. तेथून पोलिसांचे पथक तेलंगणा येथील बोगन गावात पोहचले.

आरोपीने त्‍या कारचा मूळ नंबर लावून कार नेल्याचे निष्पन्‍न झाले. त्‍यावरुन पोलिसांनी निझामाबाद येथून संशयित आरोपी समद मेहमूद शेख याला ताब्‍यात घेतले. त्‍यांनी हजरत खान (रा. कुर्ला, मुंबई) याच्‍यासोबत मिळून कार चोरी केल्याची कबुली दिली. त्‍याच्‍याकडून सोलापूर, धाराशिव, अकोला, यवतमाळ, अकोला, सूरत हायवे येथून चारचाकी गाड्या चोरल्याचे पाच गुन्‍हे उघडकीस आले. त्‍याच्‍याकडून चोरीच्‍या तीन व चोरी करण्यासाठी वापरलेली एक अशा चार कार हस्‍तगत करण्यात आल्या.

कारच्‍या दरवाजाची काच स्‍क्रू ड्रायव्‍हरच्‍या सहाय्याने फोडून हजरत खान याच्‍याकडे असलेल्या डिव्‍हाईसच्‍या सहाय्याने कार सुरु करुन कारची चोरी करीत होते. दुसरा आरोपी हजरत खान याचा पोलिस शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्‍त प्रीतम यावलकर, सहा. पोलिस आयुक्‍त प्रताप पोमण, व. पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्‍या मार्गदर्शनाखाली संजय क्षीरसागर, भाऊ कसबे, अमोल खरटमल, रवि धेंडे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, विनोद व्‍हटकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, शिवानंद भिमदे, सूर्यकांत दराडे, अतिष पाटील, विनायक जाधव, अजय चव्‍हाण, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज घाडगे, अयाज बागलकोटे, सौरभ पाटील, मच्‍छिंद्र राठोड, नितीन मोरे, दत्तात्रय कोळवले यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT