car stuck pothole Pudhari
सोलापूर

Mohol news: मोहोळमध्ये उघड्या ड्रेनेज होलच्या खड्ड्यात अडकली कार

अगोदरच रस्त्याची अवस्था दयनीय; त्यात भाजी विक्रेत्यांच्या मधोमध रांगा

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ शहरात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या ड्रेनेजच्या खड्ड्यात एक कार अडकली. या रस्त्यावर इशारा फलक नसल्यामुळे चालकाला खड्डा दिसला नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी कार बाहेर काढण्यासाठी मदत केली.

सध्या मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आदर्शचौक या मुख्य बाजारपेठ रस्त्याच्या मधोमध असलेल्या ड्रेनेजलाईनवरील पूर्वीची झाकणे बदलण्याचे काम चालू आहे. रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे खड्डे उघडे करून ठेवले असून शेजारी त्याची झाकणे ठेवली आहेत. रस्त्याकडेला दुतर्फा लागणाऱ्या गाड्या यामुळे येथील वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळावी

अनेक वर्षांपासून भाजी विक्रेते विकण्यासाठी शाळा नंबर एकच्या समोरील रस्त्यावर बसतात. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्यांना आणि आसपासच्या व्यावसायिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या भाजीविक्रेत्यांना व्यवसायासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे गरज आहे; मात्र हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेला आहे. प्रशासनाने त्यांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT