सोलापूर

Dattatray Sawant: शिक्षकांची बीएलओ ड्यूटी रद्द करावी

पटपडताळणी पुढे ढकलण्याची माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

करकंब : राज्यात सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवर पटपडताळणीचा भार टाकणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ही प्रक्रिया सध्यातरी पुढे ढकलण्यात यावी. तसेच राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट परिणाम शैक्षणिक दर्जावर होत असल्याने, ही ड्यूटी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी पात्र शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण अद्याप रखडलेले आहे. हे प्रशिक्षण तातडीने सुरू करून शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही. थकीत वेतनाची रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात यावी. जेणेकरून कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढताण थांबेल, याबाबत दत्तात्रय सावंत यांनी पंकज भोयर यांच्यासोबत चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT