सोलापूर

Ramdas Athawale: भाजप पुढील टर्ममध्ये महिला बिल पास करणारच

केंद्रीय मंत्री रामदास आठवले; कुर्डूवाडीत रिपाइं कार्यकर्त्यांतर्फे सत्कार

पुढारी वृत्तसेवा

कुर्डूवाडी : एनडीए सरकारला 2029 मध्ये लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळेल. त्याअनुषंगाने इतरांनी जरी पाठिंबा नाही दिला तरी महिला विधेयक आम्ही पास करणार आहोत एवढं बहुमत भाजपकडे असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भाजपच्या महिला विधेयकानुसार लोकसभेत 543 जागांवरुन 816 जागा करुन मतदार संघ लहान करण्याचा प्रयत्न होता, मात्र राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी विरोध केला. त्यामुळे 2029 मध्ये महिलांना जे 50 टक्के आरक्षण मिळणार होतं ते मिळाले नाही. असे असलेतरी पुढे बहुमताच्या जोरावर हे बिल पास करण्यात येईल. ना. आठवले तिसऱ्यांदा राज्यसभेत निवडून गेल्यानेे कुर्डूवाडी येथे त्यांचा रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बापूसाहेब जगताप, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी आ. संजयमामा शिंदे, सुनील सर्वगोड, बालाजी शिरसकर, दशरथ कांबळे, शिवाजी कांबळे, बलवीर बनसोडे, दत्ताजी काकडे, निवृत्ती गोरे, संजय टोणपे, अमर माने, सविता जगताप, बंडू भोसले, सूरज जगताप, आकाश जगताप, ज यश्री माने, लीना सुराणा, सुहास शेंडगे, साबीर चाऊस, आनंद कदम, दत्ताजी काकडे, दर्शन काशीद, डॉ. मोहसीन मकनू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आ. संजयमामा शिंदे म्हणाले, वंचित बहुजन वर्गासाठी राज्यामध्ये गेली 50 वर्षे ना. आठवले यांनी सातत्याने काम केले आहे. कुर्डूवाडीतील रेल्वेच्या आजपर्यंतच्या प्रश्नांमध्ये सातत्याने लक्ष घालून काम केले आहे. भविष्यामध्येही विकासाच्या दृष्टीने आपण मदत कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT