Bioplastic Production 
सोलापूर

Bioplastic Production: मका, उसापासून तयार होणार बायोप्लास्टिक

पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांना मिळणार पैसे; १ लाख शेतकरी जोडले जाणार

पुढारी वृत्तसेवा
संगमेश जेऊरे

सोलापूर : पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना बायोप्लास्टिकच्या माध्यमातून पर्यावरणपूरक व विघटन होणारे प्लास्टिक उत्पादनासाठी जोडण्यास येणार आहे. याबाबत २६ जुलै रोजी नवे धोरण जाहीर झाले. यातून ऊस, मका व स्टार्च आधारित करार शेतीद्वारे १ लाख शेतकऱ्यांना बायोप्लास्टिक्स कच्चामाल पुरवठा साखळीत समाविष्ट करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे निश्चित केले आहे.

सध्या पेट्रोलजन्य सारख्या जीवाश्म इंधनांपासून प्लास्टिक तयार केले जाते. यापासून प्लास्टिक तयार करताना कार्बन उत्सर्जन, अविघटनशील घटकांमुळे जागतिक पर्यावरणातील साखळी धोक्यात येत आहे. जागतिक युरोपीय युनियनने केलेल्या अभ्यासातून येत्या काही वर्षातच जागतिक तेल उत्पादनाच्या २० टक्के वापर हा केवळ सध्या प्लास्टिक तयार करण्यासाठी होण्याची शक्यता आहे. ही संख्या समुद्रातील एकूण माशांपेक्षा अधिक या प्लास्टिकचे उत्पादन होण्याची भीती आहे.

बायोप्लास्टिक म्हणजे....

बायोप्लास्टिक्स म्हणजे ऊस, मका, साबुदाणा कंद, बटाटा, कृषी अवशेष यांसारख्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून तयार केलेले प्लास्टिक होय.

मका पिकामुळे लॅक्टिक ॲसिड निर्मिती

राज्यात अंदाजे ३.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर मका लागवड केली जाते. यामुळे स्टार्च-ते-लॅक्टिक ॲसिड उत्पादन साखळी तसेच विदर्भ व मराठवाडा विभागातील कंपाऊंडिंग उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाची उपलब्धता होते.

एक नजर जागतिक बाजारपेठेवर

जागतिक स्तरावर बायोप्लास्टिक्स बाजारपेठेचे मूल्य सन २०२३ मध्ये अंदाजे यूएस ९६.६ अब्ज डॉलर इतके होते. सन २०३३ पर्यंत ते यूएस १,३५३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतामधील बायोप्लास्टिक्स बाजारपेठेचे मूल्य सन २०२३ मध्ये यूएस ४४७.२५ दशलक्ष डॉलर असून, सन २०३३ पर्यंत ते यूएस ३.२९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याने भारताला खूप मोठी संधी उपलब्ध आहेत.

उसाची उपलब्धता

यंदा राज्यात सुमारे २०० कार्यरत साखर कारखान्यांनी अंदाजे १०४५.५८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून सुमारे ९९.१८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. हंगामी बदल असूनही २०० हून अधिक साखर कारखान्यांच्या कार्यरत पायाभूत संरचनेमुळे मळी, ऊस रस, सिरप (प्लास्टिक ॲसिड निर्मितीसाठी) तसेच बगॅस (बायोकॉम्पोझिट्स व ऊर्जा निर्मितीसाठी) उपलब्ध आहे. उत्पादन साखर व बगॅस आधारित बायोपॉलिमर कच्च्या मालासाठी विश्वसनीय निर्देशक मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT