सोलापूर : मार्केट यार्डातील बाथरुममध्ये बिहारी मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि.6) सकाळी घडली. रामस्वरुप जगराम मुखिया (वय 49, रा. मुझफ्फर नगर, बिहार) हा मार्केट यार्डातील कांदा विभागातील बाथरुममध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला.
त्याला जेलरोड पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.