आ. रोहित पवार pudhari photo
सोलापूर

Rohit Pawar | भोंदू खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो : आ. रोहित पवार

तपास सुरू असताना शेळकेंचा अपघाती मृत्यू होणे शंकास्पदच

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्याची चौकशी सुरू असताना त्याच्या अतिशय जवळचा असलेल्या जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू कसा होऊ शकतो. हे शंकास्पद असून भविष्यात भोंदू खरातचा सुध्दा एन्काऊंटर केला जाऊ शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवारांच्या अपघाताविषयीचे पुरावे सरकारला दिले आहेत. तरीही या दुर्दैवी अपघाताबाबत संबंधित विमान कंपनीवर अद्याप कारवाई का झाली नाही. याचे उत्तर सरकारकडे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आ. रोहित पवार यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. कारमपुरी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आ. पवार येथे आले असता ते माध्यमांशी बोलत होते. खरातमुळे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येऊ शकतात. त्यांचे व्हिडिओही बाहेर पडू शकतात ही भीती राजकारण्यांना आहे. म्हणून, खरातचा एन्काऊंटर सरकारच करू शकते, असेही आ. पवार यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष महेश गादेकर, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, चंद्रकात पवार, प्रशांत गायकवाड, डॉ. प्रतिक्षा चव्हाण, प्रशांत बाबर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT