BBA student death Pudhari
सोलापूर

BBA student death: मोबाईल न दिल्याने जीवन संपवले

21 वर्षीय बी.बी.ए.च्या विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करत होता मात्र थोडे दिवस थांब पैसे आले की, आपण मोबाईल घेऊ असे आई-वडिलांनी सांगितल्याने नाराज झालेल्या 21 वर्षीय बी.बी.ए.च्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणव जगदीश मायाचारी असे त्याचे नाव आहे.

मोहोळ शहरात असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये 4 एप्रिल रोजी सकाळी मुलाने आत्महत्या केल्याची ही घटना उघडकीस आली. 3 एप्रिल रोजी रात्री 10 वा.चे सुमारास प्रणव हा जेवण करुन घराच्या दुस-या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. 4 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास प्रणव अजून खाली कसा आला नाही हे पाहण्यासाठी त्याची आई तो झोपलेल्या खोलीजवळ गेली. त्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी प्रणव यास आवाज दिला. आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी प्रणव चे वडील जगदीश यांना बोलावून घेतले.

खोलीचा दरवाजा तोडून रुममध्ये जावून पाहिले. त्यावेळी प्रणव हा नायलॉनच्या रस्सीने छताचे पंख्यास गळफास घेतलेला आढळला. तात्काळ त्यास गळफास सोडवून ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT