बार्शीत भगवंतांचा प्रकटोत्सव भक्तिभावात 
सोलापूर

Barshi News : बार्शीत भगवंतांचा प्रकटोत्सव भक्तिभावात

हजारो भक्तांच्या उपस्थितीत शोभायात्रा; महाप्रसादाचा 40 हजार भक्तांनी घेतला लाभ

पुढारी वृत्तसेवा

गणेश गोडसे

बार्शी : बार्शीचे ग्रामदैवत असलेल्या भगवंतांचा प्रकटोत्सव बार्शी शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती व भगवंत महोत्सव समितीच्या संयुक्तपणे भगवंत मोहोत्सवामधुन विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक आदी भरगच्च कार्यक्रम भगवंत मैदानावर दि. 21 ते 28 एप्रिल दरम्यान राबवण्यात आले. या यावर्षी प्रथमच इतिहासात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उपस्थित राहून भगवंत महोत्सवामध्ये सहभाग घेतल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला होता.

मंगळवारी (दि.28) भगवंत प्रकटोत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे साडे चार वाजता ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन पार पडले.पंच कमिटीच्या वतीने पहाटे 6 वाजता महापुजा करण्यात आली. दुपारी 12 ते सायंकाळी 3 या वेळेत मॉडेल हायस्कूल येथे मॉर्निग क्लबच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा शहर व तालुक्यातील 30 ते 40 हजार भक्तांनी लाभ घेतला. भगवंत मोहोत्सवानिमित्त भगवंताची आरती करून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माजी आ. राजेंद्र राऊत, ह.भ.प जयवंत बोधले महाराज, रमेश पाटील, विजय राऊत, रणवीर राऊत, विजय चव्हाण, दीपक राऊत, भैया बारंगुळे यांच्यासह भगवंत मोहोत्सव समिती सदस्य, दिंडेकरी आदी उपस्थित होते.

शोभायात्रेत सजवलेल्या बैलगाडीत उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भगवी पताका,अंगावर नऊ वारी साडी,डोक्यावर तुळस,कलश घेऊन महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, भगवंत देवस्थान समितीचे सरपंच दिलीप बुडूख, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, नाना सुरवसे, भारत पवार, बाळासाहेब तातेड, विलास रेणके, प्रशांत कथले यांच्या सह भगवंत मोहोत्सव कमिटी सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT