सोलापूर

Barshi art center raid: नियमभंग करणाऱ्या कला केंद्रावर छापा

50 लाखांचा मुद्देमाल जप्त; बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असलेल्या कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत 50 लाख 13 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण 72 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याचा भाग म्हणून दि. 24 मे रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी ते लातूर रोडवरील लवंगी मिरची या कला केंद्रात नियमबाह्य पद्धतीने कार्यक्रम सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी कला केंद्र सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नृत्यांगना, ग्राहक आदी एकूण 72 जणांना ताब्यात घेतले.

अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ धनराज केकाण, स्वाती काटे, पो. कॉ. राहुल बोंदर, सुरेश बिरकले, व महिला पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT