सोलापूर

बार्शी : मुंगशीत ६० हजाराचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

backup backup

मुंगशी; पुढारी वृत्तसेवा : मुंगशी (ता. बार्शी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे साडे पाच किलो गांजा असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १२) सायंकाळी चारच्या सुमारास मुंगशी वा. येथील लिंबराज दगडू घोडके (रा. मुंगशी) यांच्या शेतात ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हा शाखेला बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वैराग पोलिसांना घेवुन मुंगशी वा. येथे संशयीत आरोपी लिंबराज दगडू घोडके (रा. मुंगशी) यांच्या शेतात ज्वारीच्या पिकात १०० पेक्षा जास्त गांजाची झाडे मिळुन आली. त्याचे वजन केले असता सुमारे साडेपाच किलोचा मुद्देमाल निघाला. त्याची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे.

ही कारवाई पार पाडण्यासाठी वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, शिवाजी हाळे, अमोल भोरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक राजेश गायकवाड, सहायक उपनिरिक्षक, श्रीकांत गायकवाड, हवालदार बिराप्पा पारेकर, हरिदास पांढरे, सलीम बागवान, पोलीस कॉन्टेबल आबासाहेब मुंडे, चालक-दिलीप थोरात यांनी कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT