Viral video farmer daughter
सोलापूर : सततची नापीकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने सोलापुरातील बार्शी येथील शेतकऱ्याने जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वडिलांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. "पप्पा माझे खूप लाड करायचे, माझे पप्पा गेले तसे कोणाचे जाऊ नये," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. एका निष्पाप मुलीच्या तोंडून आलेले हे हृदयद्रावक उद्गार ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
शेतकऱ्याच्या या लेकीचा आपल्या वडिलांच्या आठवणी सांगतानाचा, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.