श्वान प्रशिक्षण केंद्र 
सोलापूर

Solapur News : बारामती श्वान प्रशिक्षण केंद्राचे काम संथगतीने

२०२१ मध्ये मान्‍यता व निधी मिळूनही काम पूर्ण नाही

पुढारी वृत्तसेवा

सुमीत वाघमोडे

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील बारामती (गोजुबावी) येथे पोलिसांच्या पहिल्या अत्याधुनिक राज्यस्तरीय श्वान प्रशिक्षण केंद्र आणि ब्रीडींग सेंटरच्‍या उभारणीचे काम पूर्णत्‍वास येत आहे. २०२१ मध्ये या प्रशिक्षण केंद्रास मान्‍यता मिळाली. त्‍यासाठी ५७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. परंतु अद्यापही हे केंद्र सुरू नाही. त्‍यामुळे अजूनही राज्‍यातील नव्‍या श्वानांना इतर राज्‍यात प्रशिक्षणासाठी पाठविण्याची वेळ आली आहे.

राज्‍यात पुण्यातील शिवाजी नगर येथे एकच श्वान प्रशिक्षण केंद्र आहे. १९६४ साली त्‍याची उभारणी करण्यात आली. परंतु गेल्या दहा वर्षांत या श्वान प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधकाम मोडकळीस आली आहे. येथील जागा अपुरी असून, ही जागा श्वान, श्वान हस्तक, श्वान प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देण्यासाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने २०२१ मध्ये बारामतीतील गोजुबावी येथे सात हेक्टरवर सर्व सोयींनीयुक्त, अद्ययावत ‘श्वान प्रशिक्षण केंद्र’ आणि ब्रीडींग सेंटर उभारण्यास मान्यता दिली. त्‍यासाठी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्‍याचे काम सुरू झाले, परंतु पाच वर्षे झाली तरी ते केंद्र सुरू झालेले नाही.

विशेष म्हणजे सध्या पोलिस दलात रुजू झालेल्या श्वानांचे ब्रीडींग करण्यात येत नाही. परंतु भविष्यात या श्वानांचे ब्रीडींग करुन त्‍यातून चांगल्या दर्जाच्‍या श्वानांची पैदास करण्यासाठी येथे ब्रीडींग सेंटर असणार आहे. याचा फायदा पोलिस दलास होणार आहे. हे केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पोलिस दलातील श्वान प्रशिक्षकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT