वाशिंबे : येथील केळी पुरवठादार धनराज ज्ञानदेव भोईटे (वय 44, रा. वाशिंबे) यांची 40 लाख 67 हजार 272 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीवरुन टेंभुर्णीतील येथील केळी एक्स्पोर्ट कंपनीचे मालक अजिंक्य मधुकर देशमुख यांच्या विरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाशिंबेतील भोईटे यांची केळी पुरवठा करणारी कंपनी आहे. कंपनी मार्फत ते आजूबाजूच्या शेतकर्यांची केळी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी पुरवठा करतात.2024 मध्ये त्यांनी देशमुख यांच्या कंपनी सोबत केळी सप्लाय करण्याचं व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी देशमुख याला नोव्हेंबर 2024 मध्ये 24 लाख 3 हजार 151 रुपयांची केळी दिली होती.त्यांनी 15 ते 20 दिवसात पैसे देणे आवश्यक होते मात्र केळी पुरवल्यानंतर खूप दिवस पैसे न दिल्याने त्यांना वारंवार फोन करून केळी दिलेल्या पैशाची मागणी केली.
यानंतर देशमुख यांनी केवळ 5 लाख 84 हजार 998 रुपये दिले. तसेच वाशिंबे येथील मथिन नबीलाल शेख यांनीही देशमुख यांना 24 लाख 75 हजार 117 रुपये केळी दिली होती. त्यांनाही देशमुख यांनी 2 लाख 69 हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम दिली नाही. यावरून देशमुख याने विश्वास संपादन करून केळी घेऊन पैसे न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.