सोलापूर

State level handwriting competition: राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत बागलवस्ती शाळेचे देदीप्यमान यश

हस्ताक्षर स्पर्धेत दिशा पोरे प्रथम, तर शरयू पोरे तृतीय; मान्यवरांच्या हस्ते गौरव

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पुणे येथील माऊली प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये वाखरी केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती (ता.पंढरपूर)या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर लेखणीच्या जोरावर यश संपादन केले आहे.

हस्ताक्षर स्पर्धेच्या लहान गटात दिशा दत्तात्रय पोरे हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच मोठ्या गटात इयत्ता पाचवीतील शरयू धनाजी पोरे हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. पुणे येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल हरी बोंगे, मेडशिंगी विद्यालयाचे प्राचार्य औदुंबर मेटकरी, बार्शी कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य सुग्रीव गोरे, माजी उपशिक्षणाधिकारी मारुती थिटे आणि न्यू इंग्लिश स्कूल (वडगाव) चे माजी प्राचार्य शंकर डूबल उपस्थित होते.

विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुदाम शिंदे, शिक्षक धनाजी देशमुख आणि राणी बाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशामुळे बागलवस्ती शाळा आणि वाखरी केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT