Crime Pudhari
सोलापूर

Solapur Crime: ऑर्केस्ट्रा बार चालवण्यावरून एकावर प्राणघातक हल्ला

विजापूर रोडवरील नागेश बारमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ऑर्केस्ट्रा बार चालविण्यावरून एकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्यचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 15) मध्यरात्री विजापूर रोडवरील हॉटेल नागेश बार येथे घडली. युवराज ऊर्फ उमेश मारुती लोंढे (रा. वसंत विहार, सोलापूर) असे हल्ल्यात गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दुपारी विजापूर नाका पोलिसांनी उमेश याचा जबाब घेतला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

उमेश लोंढे हा ऑर्केस्ट्रा बारचा एजंट म्हणून काम करतो. या अगोदर त्याने काही ऑर्केस्ट्रा बारही चालवले आहेत. रविवारी उमेश हा विजापूर रोडवरील हॉटेल नागेश ऑर्केस्ट्रा बारमध्ये बसला होता. यावेळी सात ते आठजण तेथे आले. आमच्या एरियात ऑर्केस्ट्रा बार चालवायचा नाही असे म्हणत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

उमेशने तेथून पळ काढत थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्यानंतर त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. आमच्या एरियात ऑर्केस्ट्रा बार का चालवतो म्हणत आकाश जाधव उर्फ ए. जे., अमोल गायकवाड यांच्यासह पाच ते सहा जणांनी मिळून तिक्ष्ण हत्यार, फायटरने मारहाण केली. यापुढे येथे दिसल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे उमेश लोंढे याने पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT