Burn File Photo
सोलापूर

Burn attempt: पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे ही घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत एकावर पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे ही घटना घडली.

शिवराज सिद्राम लांडगे (वय 25, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) हा शनिवारी गावातील शेतात असताना आदिल गोलंदाज, सोमेश व इतर दोघे तिथे आले. तक्रार मागे घे म्हणत पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT