Ujani Dam 
सोलापूर

Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून चंद्रभागेत येणार पाणी

आषाढी एकादशीसाठी उजनी धरणातून शनिवारी (दि. १८) सकाळी ६ पासून १६०० क्युसेकने पाणी सोडले जाणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आषाढी एकादशीसाठी उजनी धरणातून शनिवारी (दि. १८) सकाळी ६ पासून १६०० क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आषाढी एकादशीला चंद्रभागेत स्नान करता येणार आहे.

२५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, त्याआधी तीन दिवस पाणी पोहोचेल यादृष्टीने पाणी सोडले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता उजनी धरणात एकूण ९२.६० टीएमसी पाणीसाठा होता. यात उपयुक्त पाणी २८.९४ टीएमसी आहे.

धरणात दौंड येथून ३ हजार ७८० क्युसेक विसर्ग येऊन मिसळत आहे. कालवा, बोगद्यातूनही विसर्ग सुरू उजनीतून खरीप हंगामातील पिकांसाठी मुख्य कालव्यातून २०० क्युसेक, सीना माढा बोगद्यातून १४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उसासह मूग, उडीद या पिकांना पाणी मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT