सोलापूर

Fruit Prices: सफरचंदाचे दर घसरले, पपई-पेरू महागले

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने बाजारात फळांना मागणी वाढली आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने बाजारात फळांना मागणी वाढली आहे. उपवास तसेच आरोग्याच्या दृष्टीने फळांना पसंती वाढत असल्याने आगामी काळात मागणी असलेल्या फळांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या पपई आणि पेरूच्या दरात वाढ झाली आहे. सफरचंदाची आवक वाढल्याने त्याचे दर मात्र कमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची मोठी आवक होत असल्याने ते १५० ते २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. काश्मीरचे केनूर डिलॅक्स सफरचंद २५० ते २६० रुपये, तर न्यूझीलंडचे रॉयल गाला ३०० ते ३५० रुपये किलो आहे. दक्षिण आफ्रिकेचा पेअर ३०० रुपये, तर भारतीय पेअर १५० रुपये किलो आहे. ऑस्ट्रेलियाची द्राक्षे ४०० रुपये किलो आणि थायलंडची लिची ४०० रुपये किलो आहे. डाळिंबाचे दर ८० ते १०० रुपये किलोवर आले आहेत. महिनाभरापूर्वी ते ३५० रुपयांपर्यंत होते.

ड्रॅगन फ्रूट १०० ते १२० रुपये किलो आहे. पपई २०-३० रुपयांवरून ५०-६० रुपये नग झाली आहे. पेरूचे दरही ३०-४० रुपयांवरून १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. केळी ३० ते ५० रुपये डझन, तर पायनापल ४० ते ५० रुपये नग दराने स्थिर आहे. ऑस्ट्रेलियाचा मिनी संत्रा २५० ते २६० रुपये, तर इजिप्तचा किन्नू संत्रा १५० रुपये किलो आहे. ऑस्ट्रेलियाची द्राक्षे ४०० रुपये किलो आणि थायलंडची लिची ४०० रुपये किलो आहे.

गोल्डन कीवी २०० ते २२० रुपये, तर न्यूझीलंडची कीवी १०० ते १२० रुपये बॉक्स दराने विकली जात आहे. श्रावणातील वाढती मागणी कायम राहिल्यास फळांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

श्रावण सुरू असून बाजारात देशी आणि विदेशी फळे आली आहेत. विदेशी फळांच्या दरावर डॉलरच्या किमतीचा प्रभाव असतो. डॉलरच्या किमतीत चढ उतार झाले तर दर कमी जास्त होतात. बाजारात सफरचंद, केळी, संत्रा या फळांना सध्या जास्त मागणी आहे.
- आरिफ बागवान, फळ व्यापारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT